अकरावी, बारावीची वाढीव फी घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा

अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांकडून वाढीव फी उकळणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी छाञभारतीच्या विद्यार्थी संघटनेने मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे केली आहे. शिक्षण विभागाने अनुदानित महाविद्यालयांची फी ठरवली आहे. मात्र काही महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून अवाजवी फी उकळत आहेत. या विरोधात छाञभारतीने आवाज उठविला आहे.

छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले व कार्यकारिणी सदस्य निकेत वाळके यांनी शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांना याविषयीचे निवेदन दिले आहे. अकरावी ऑनलाईन प्रकेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश पूर्ण झाले आहेत. तसेच अल्पसंख्याक, इनहाऊस कोटय़ातील प्रवेशही होत आहे. काही अनुदानित महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून जादा फी वसूल करीत असल्याचा आरोप छाञभारतीने केले आहे. शिक्षण उपसंचालकांनी आपल्या स्तरावरुन सर्व महाविद्यालयांना शासनाने प्रमाणित केलेल्या दरापेक्षा वाढीव फी आकारु नये तसेच यामध्ये दोषी आढळणाऱया महाविद्यालयांवर कारवाई करत विद्यार्थ्यांकडून वसुल केलेली वाढीव फी परत करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी छात्रभारतीने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या