मुंबईत 1437 कोरोनाबाधित, 38 जणांचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या 36 हजार 710 वर

790

मुंबईत कोरोना रुग्णवाढ सुरूच असून आज आणखी 1437 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे एकूण रुग्णसंख्या 36 हजार 710 वर पोहोचली आहे. तर एकाच दिवसांत 38 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडाही 1173 वर पोहोचला आहे.

मुंबईत मृत झालेल्या 38 जणांमध्ये 22 पुरुष आणि 16 महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये 28 जणांना काही दीर्घकालीन आजारही होते. यातील 20 रुग्णांचे वय 60 वर्षांवरील, 16 रुग्णांचे वय 40 ते 60 वर्षे आणि दोन मृतांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी होते. दरम्यान, मुंबईत रुग्ण वाढले असले तरी एकाच दिवसांत 715 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या 16 हजार 8 वर पोहोचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या