अरे वाह…! 92 वर्षांच्या आजीने केली कोरोनावर मात

876

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण देखील बरे होत आहेत. त्यातच आज एका 92 वर्षाच्या आजीने कोरोनावर मात केली आहे. मुंबई मधील कोहिनूर रुग्णालयातून करोनामुक्त झालेल्या या आजींना आज डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टर, नर्स आणि मेडिकल स्टाफ यांनी टाळ्या वाजवून आजींचं अभिनंदन केलं.

आजींना अचानक खोकला, ताप तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, एकंदर लक्षण पाहून कोरोनाची चाचणी करण्यात आली त्याचा अहवाल पॉसिटीव्ह आला म्हणून त्यांना कोहिनूर रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले. आजींच्या घरातील त्यांच्या दोन केअरटेकर पैकी एकाला कोरोनाची लागण झाली आणि काही दिवसांनी आजींना देखील लक्षण दिसायला लागली. अशी माहिती त्यांचा नातु गौरव मथुरावाला यांनी दिली. या महिलेची कोरोनावार मात यासाठी महत्वाची आहे कारण तिला काही वर्षांपूर्वी हृदयविकार झटका आलेला होता तसेच ती हायपरटेंशन या आजारानेही ग्रासलेली होती. त्यामुळे वय आणि इतर आजार असताना त्यांनी दाखवलेल्या हिमत्तीमुळे आणि त्या दिलेल्या उपचाराला साथ देत होत्या त्यामुळेच त्या लवकर बऱ्या होऊ शकल्या असे मत कोहिनूर रुग्णालयाचे डॉ. चेतन वेलांनी यांनी व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या