मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, दोन भाऊ गंभीर जखमी

532

मुंबई-गोवा महामार्गावरील कापडगाव येथील वळणावर शनिवारी वॅगनार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दोन भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. शहजाद इंद्रीस अली पाशा (40) अन्वर इंद्रिस अली पाशा (23)  हे दोघे पाली येथून दुचाकीवरून कुवारबांवकडे येत होते. त्याचवेळी कापडगाव येथे समोरून येणाऱ्या वॅगनॉरने धडक दिली.

त्यात दुचाकीवरील दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. त्या दोघांना जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रूग्णवाहिकेतून जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या