मुंबई-नाशिक प्रवासासाठी कसरत, कसारा घाटात रस्त्यांना मोठे तडे

168
kasara-crack

सामना प्रतिनिधी । ठाणे

शुक्रवारपासून कोसळाऱ्या पावसाने मुंबई-ठाणे-नाशिक या भागात थैमान घातलं आहे. मुसळधार पावसाचा तडाखा मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटाला बसला आहे. कसारा घाटातील जु्न्या रस्त्याला मोठे तडे गेले असून या मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली आहे. तर नवीन कसारा घाटातून वाहतूक सुरू असली तरी नव्याने बांधलेल्या घाटाच्या रस्त्यालाही तडे गेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या