विमान प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी… या दिवशी बंद राहणार उड्डाणं

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील दुसरे सर्वात गजबजलेले विमानतळ आहे. दर मिनिटाला इथे विमानं उड्डाण लँडिंग करत असतात. मात्र लवकरच हे विमानतळ काही तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे अक्षरश: गजबलेल्या या विमानतळावर बऱ्यापैकी शांतता राहणार आहे.

मुंबई विमानतळावर 18 ऑक्टोबर रोजी नियमित देखभालीसाठी तब्बल सहा तास विमानतळ उड्डाणासाठी बंद करण्यात येणार आहे. सकाळी 11 ते सायंकाळी पाच दरम्यान 18 ऑक्टोबरला एकही विमान उड्डाण घेणार नाहीए. त्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होणार आहे. मात्र देखभालीची कामे सुरळीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.