दीर्घ आजारातून बरा झालेल्या इरफान खानला ओळखणे झाले कठीण

4912

बॉलीवूड अभिनेता इरफान खान याच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. लंडनमध्ये कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर इरफान पुन्हा एकदा कामाला लागला आहे. नुकताच तो लंडनहून मुंबईत परतला. यावेळी आजारापणामुळे कृश झालेल्या इरफानने हाताने आपला चेहरा झाकला होता. तसेच तो मुंबई विमानतळावर व्हीलचेअरवर बसून आला. आजारपणामुळे खूपच खंगल्याने त्याला ओळखणेही कठीण झाले आहे.

इरफानला कर्करोग झाल्याचे कळताच तो तत्काळ लंडनला उपचारासाठी गेला होता. वर्षभर तेथे उपचार घेतल्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला तो हिंदुस्थानात परतला. पण त्यानंतर त्याला कोणीही पाहिले नाही किंवा आजारपणात सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या इरफाननेही चाहत्यांशी संपर्क केला नाही. मात्र लंडनमध्ये हिंदी मिडीयम या चित्रपटाच्या सिक्वेलच्या शूटींगसाठी गेलेला इरफान मुंबई विमानतळावर नुकताच नजरेस पडला. पण नेहमी चाहत्यांचे हसून आभार माननाऱ्या इरफानने यावेळी आपला चेहरा हाताने झाकलेला होता. तसेच तो व्हिलचेअरवर बसलेला होता. यामुळे त्याला ओळखणे चाहत्यांना कठीण झाले.

पण गाडीत बसताना काहींनी त्याला बघितले आणि त्यांना धक्का बसला. कारण इरफान खूपच कृश व थकलेला दिसत होता. पण तरीही तो परत आल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला असून इरफानला मोठया पडद्यावर बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या