अमिर आणि अक्षयच्या दाढीमिशांवरून चाहते भिडले

671

बॉलीवूड अभिनेता मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खान याने सोमवारी त्याचा नवीन चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ मधील फर्स्ट लूक सोशल मीडियावर पोस्ट केला. यात आमिर खान शीख व्यक्तीच्या पेहराव्यात दिसतोय. यासाठी अमिरने दाढी मिशाही वाढवल्याने त्याच्या परफकेक्शननिस्ट असण्याचे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे केशर चित्रपटात अक्षय कुमारने नकली दाढी मिशा लावत देशभक्त असल्याचा आव आणला. असा आरोप अमिरच्या चाहत्यांनी केला. यावर अक्षयचे फॅन चिडले असून अमिरच्या चाहत्यांबरोबर भिडले आहेत.

‘लाल सिंह चड्ढा’ मधील फर्स्ट लूकमध्ये अमिरच्या चेहऱ्यावरचे भाव थ्री ईडियट्स आणि पीके चित्रपटातील अमिर खानचे होते तसेच निरागस दिसत आहे. या भूमिकेत चपखल बसावं म्हणून अमिरने वजन वाढवण्याबरोबरच दाढी मिशाही वाढवल्या. यामुळे तो शीख व्यक्तीरेखेत शोभूनही दिसतोय.

पण अक्षयने मात्र केशरी चित्रपटात शीख दिसण्यासाठी नकली दाढी मिशा लावल्या होत्या. यावरुनच दोघांचे चाहते त्यांची एकमेकांशी तुलना करत त्यांना ट्रोल करत आहे. अमिरचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट एका जवानाच्या आयुष्यवर आधारित कथानक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या