मुंबई – 11 ते 17 मे एपीएमसी मार्केट राहणार बंद

1441

वाशी येथील मुंबई एपीएमसीतील पाचही मार्केट्स सोमवारपासून म्हणजेच 11 मे पासून 17 मे पर्यंत बंद राहणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोकण आयुक्त, पोलीस आणि माथाडी नेते यांची एक बैठक बोलवण्यात आली होती. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. दरम्यान, या शनिवार-रविवारी एपीएमसी मार्केट सुरू राहील.

नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. बाजार परिसरातील काही जणांना याची लागण झाली आहे. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. दरम्यान, या काळात व्यापारी, वाहन चालक, कामगार यांची देखील तपासणी होण्याची शक्यता आहे. तसेच मार्केटचं निर्जंतूकीकरण करण्यात येईल अशी माहिती ही मिळते आहे.

आपली प्रतिक्रिया द्या