मुंबईत ८ एप्रिलपर्यंत १० टक्के पाणीकपात

41

सामना ऑनलाईन, मुंबई

गुंदवली-कापूरबावडी-भांडुपच्या जलबोगद्यावर झडपा बसविण्यात येणार असल्याने मुंबईत २५ मार्च ते ८ एप्रिलदरम्यान १० टक्के पाणीकपात केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेच्या जल विभागाने केले आहे. कापूरबावडी ते भांडुप संकुल येथे पालिकेच्या वतीने जलबोगद्यावर झडपा बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे कुलाबा, गिरगाव, भायखळा, दादर, माहीम तसेच वांद्रेपासून दहिसरपर्यंत तर कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, कांजूर, भांडुप विभागात दहा टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या