संपत्ती गोरगरिबांच्या भल्यासाठी खर्च करायची असते हे आई आणि गांधीजींकडून शिकलो !

1243

आयुष्यात मानवता आणि परोपकाराला अनन्यसाधारण महत्व असते.आपण कमावलेल्या संपत्तीचा बहुतांश भाग हा गोरगरीब आणि गरजूंच्या भल्यासाठी खर्च करायची असते हि प्रेरणा मी माझी आई आणि महात्मा गांधींजी यांच्याकडून घेतली.माझ्या दानशूरतेचा फटका मला माझ्या उद्योगाला अथवा यशाला कधीच बसला नाही. कारण आईकडून घेतलेली परोपकाराची शिकवण हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भागच असल्याची धारणा करून मी आजवर जगलो आहे, असे मनोगत विप्रो उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा अझीम प्रेमजी यांनी चेन्नईतील ‘लीडिंग ए यंग एंड डिजिटल इंडिया’ विषयावरील अनंतारामाकृष्णन मेमोरियल व्याख्यानमालेत बोलताना व्यक्त केले.

हिंदुस्थानचे दानशूर “बिल गेट्स” म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी आतापर्यंत आपल्या अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरिबांच्या मदतीसाठी 1.45 लाख रुपये दान केले आहेत. शिवाय आपल्या संपत्तीतील 52.750 कोटी रुपयांचे शेअर्स सामाजिक ,शैक्षणिक आणि वैद्यकीय मदतकार्यासाठी दान करण्याची घोषणा केली आहे. 53 वर्षीय प्रेमजी यांच्या दानशूरतेचे कौतुक दस्तुरखुद्द बिल गेट्स यांनीही केले आहे. यंदा 30 जुलैला प्रेमजी विप्रोच्या चेअरमन पदावरून निवृत्त झाले असून आता ते आपल्या उद्योगसमूहाचे नॉन-एग्जीक्यूटिव डायरेक्टर और फाउंडर चेयरमैन म्हणून कंपनीच्या संचालक मंडळात कार्यरत आहेत.

आईकडून परोपकाराची शिकवण घेतली
माझ्या आयुष्यावर माझी आई आणि महात्मा गांधी यांच्या मानवता आणि परोपकारी शिकवणीचा मोठा पगडा आहे.वयाच्या ७८ व्या वर्षापर्यंत माझी आई ऑर्थोपेडिक रुग्णालयाच्या माध्यमातून पोलिओग्रस्त बालकांची सेवा करीत होती.पेशाने डॉक्टर असलेल्या माझ्या आईने मुंबईतील त्या विशेष रुग्णालयात रुग्णसेवेत स्वतःला झोकून दिले होते. शिवाय ते रुग्णालय चालवणाऱ्या ट्रस्टची ती संस्थापकही होती.आपण कमावलेल्या संपत्तीचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी व्हायलाच हवा ,या महात्मा गांधीजींच्या शिकवणीचा मोठा प्रभाव माझ्यावर आहे ,असेही प्रेमजी यांनी अनंतारामाकृष्णन मेमोरियल व्याख्यानमालेतील पुष्प गुंफताना म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या