मुंबईचा कोलकातावर थरारक विजय

45

सामना ऑनलाईन । मुंबई

शेवटच्या षटकांपर्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं कोलकात्याचा ४ गडी राखून पराभव केला आहे. मुंबईकडून नितिश राणानं सर्वाधीक ५० धावा केल्या, तर हार्दिक पंड्यानं शेवटच्या षटकांमध्ये झटपट २९ धावा केल्या. कोलकात्याकडून अंकित राजपुतनं ३, नरीन, यादव आणि वोक्सनं प्रत्येकी एक बळी मिळवला.

याआधी कोलकाता नाइट रायडर्सनं प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १७८ धावा केल्या. कोलकात्याकडून मनीष पांडेनं ८१ धावा केल्या, ख्रिस लिननं ३२ धावा करत पांडेला उत्तम साथ दिली. मुंबईकडून कुणाल पंड्यानं ३, मलिंगानं २, मॅक्लेनाथन आणि बुमराहनं प्रत्येकी एक बळी मिलवला.

कोलकात्याचा पराभव करत मुंबईनं यंदाच्या मोसमात पहिल्या विजयाची नोंद केली आहे. मुंबईची अवस्था ५ बाद ११९ असताना राणा आणि पंड्या जोडीने मुंबईसाठी विजय खेचून आणला.

आपली प्रतिक्रिया द्या