शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती महापालिकेत साजरी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी आज (दिनांक 23 जानेवारी 2021 ) रोजी महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी उप महापौर अँड.सुहास वाडकर, आरोग्य समिती अध्यक्षा श्रीमती प्रविणा मोरजकर,नगरसेवक किरण लांडगे नगरसेविका श्रीमती प्रज्ञा भुतकर, उपायुक्त (आपत्‍कालीन व्यवस्थापन ) प्रभात रहांगदळे, “ऐ” विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती चंदा जाधव, महापालिका चिटणीस (प्रभारी )श्रीमती संगीता शर्मा हे मान्यवर उपस्थित होते.

महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यावेळी म्हणाल्या की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचा ठराव 25 जुलै 2019 च्या सभेत नगरसेवक किरण लांडगे यांनी मांडला होता. महापालिका सभागृहाच्या मंजुरीनंतर तसेच राज्य शासनाच्या मान्यतेनंतर यावर्षीपासून प्रथमच शासकीय स्तरावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती बृहन्मुंबई महानगरपालिकेत साजरी करीत असल्याचे महापौर म्हणाल्या. त्यासोबतच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणसुद्धा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते आज होत असून या सोनेरी क्षणाचे साक्षीदार असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे महापौरांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या