लेझीम, ढोलताशा पथके…पारंपरिक वेशभूषेतील महिलांची बुलेटस्वारी ; शोभायात्रांनी अवघी मुंबापुरी दुमदुमली

रांगोळय़ा, गुढय़ा तोरणे, ढोलताशांचा गजर, विविध विषयांवरील चित्ररथ, पारंपरिक वेशभूषेत रस्त्यांवर उतरलेली तरुणाई, बुलेटवर स्वार झालेल्या रणरागिणी, चिमुकल्यांचा उत्साह आणि मराठमोळय़ा शुभेच्छा असे उत्सवी वातावरण बुधवारी मुंबईसह उपनगरांत मराठी नववर्षानिमित्त दिसून आले. गिरगावसह दादर, लालबागपरळ, वरळी, ताडदेव, विलेपार्ले, गोरेगाव, चारकोप अशा विविध भागातून निघालेल्या शोभायात्रांनी अवघी मुंबई दुमदुमली. मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही शोभायात्रेत सहभाग घेतला होता

 गिरगावच्या शोभायात्रेत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य पुतळा रथात ठेवण्यात आला होता.

गिरगावात एकवीरा देवीची 22 फुटी प्रतिमा

गिरगाव येथे अवघी तरुणाई रस्त्यावर उतरली. फडके मंदिर रोड, प्रार्थना समाज, गिरगाव नाका, ठाकुरद्वार, चिराबाजार भाग गर्दीने फुलून गेला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित स्वागतयात्रेत  भव्यदिव्य आणि आकर्षक चित्ररथ होते. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. एकवीरा देवीची 22 फुटी भव्य प्रतिमा हे सोहळय़ाचे खास आकर्षण ठरले. स्वागत यात्रेत अनोख्या पद्धतीने दक्षिण मुंबईचा गौरव करण्यात आला. दक्षिण मुंबईत वास्तव्यास असलेले स्वातंत्र्यसैनिक, मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेट, दक्षिण मुंबईतील कलाकार यांना अनोखी मानवंदना देण्यात आली. दक्षिण मुंबईतील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे तसेच शिक्षण संस्था आदींची माहिती देणारे फलक जागोजागी लावण्यात आले होते.

 गिरगावातील  शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला सेल्फी घेताना दिसत आहेत

 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्रमांक 10 तर्फे प्रभादेवी ते माहीमपर्यंत गुढीपाडव्यानिमित्य भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शिवसेना नेतेयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सहभागी झाले होते.  

 चिमुकली झाशीची राणी शोभायात्रेचे आकर्षण

 शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेली बच्चे पंपनी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती.

 

चेंबूरमध्ये नववर्षाचा जल्लोष

आरसीएफ  कर्मचारी सेनेच्या वतीने चेंबुर येथे आरसीएफ  क्रीडा संकुल ते गंगाधर देशमुख हॉलपर्यंत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.  आरसीएफचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुडगेरीकर यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. शोभायात्रेला डॉ. मुडगेरीकर , नजहत शेख (डायरेक्टर, फायनान्स), मिलिंद देव (डायरेक्टर, टेक्निकल), श्रीवास्तव (ईडी , ट्रॉम्बे) तसेच आरसीएफ कर्मचारी सेनेचे सरचिटणीस दत्तात्रय परब, माजी नगरसेविका अंजली नाईक, अस्मिता महिला मंडळाच्या पदाधिकारी तसेच आरसीएफचे कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

 पाडव्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात सहभागी झालेले गिरगावकर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

  सिंधुदुर्गकोल्हापूर  जिल्हा संपर्कप्रमुख तसेच जय भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण दुधवडकर आणि माजी नगरसेविका अरुंधती दुधवडकर यांच्या वतीने ताडदेवमध्ये आयोजित हिंदू नववर्ष स्वागत वैभव यात्रेला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, आमदार सुनील शिंदे, माजी महापौर महादेव देवळे, माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, उपविभागप्रमुख सुजित राणे, जयश्री बळ्ळीकर, उपविभाग संघटक शोभा जगताप, सहसमन्वयक किरण बाळसराफ, हरीश धारिया, यशोदा कोटयन, युवासेना विस्तारक हेमंत दुधवडकर, शाखाप्रमुख सिद्धेश माणगावकरदेखील उपस्थित होते.

 अंधेरीत गरजू महिलांना साखर वाटप 

अंधेरी पश्चिम विधानसभा प्रभाग क्रमांक 65 च्या महिला उपशाखा संघटक रेवती सुर्वे यांच्या वतीने विभागातील गरजू महिलांना गुढीपाडव्याच्या निमित्त साखर वाटप करण्यात आली. यावेळी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम,  ग्राहक संरक्षण कक्षाचे सहचिटणीस रमेश मालवणकर, युवासेनेचे जितू गोसावी, सुप्रिया बंगलेकर, माणगाव उपविभागप्रमुख चंद्रकांत सुर्वे, उपशाखाप्रमुख राकेश चौधरी, संदीप करले, गटप्रमुख संगीता सुव्रे, राजश्री चाचे, अमरीश शेलाणकर, राजेश भिकले उपस्थित होते.

जोगेश्वरीत आदिवासींचे तारपा नृत्य

गुढीपाडव्यानिमित्त जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी भव्य शोभायात्रा काढली होती. यात महिला व पुरुष बाईकस्वार, शालेय विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, पारंपरिक वेशभूषेत महिला व पुरुष कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले. आदिवासींचे तारपा नृत्य तसेच कोळी नृत्य आकर्षणाचा पेंद्रबिंदू ठरला. गुढीपाडव्यानिमित्त इच्छापूर्ती गणेश मंदिरात कृष्ण-राधा, विठ्ठल-रखुमाई व श्री दत्तमूर्तीची स्थापनादेखील करण्यात आली. या शोभायात्रेत विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, महिला संघटक रचना सावंत, शालिनी सावंत, माजी नगरसेवक बाळा नर, प्रवीण शिंदे, रेखा रामवंशी, उपविभागप्रमुख पैलाशनाथ पाठक, जितेंद्र वळवी, जयवंत लाड, साटम, शाखाप्रमुख मंदार मोरे, प्रदीप गांधी, नंदू ताम्हणकर, अमर मालवणकर, संदीप गाढवे, बाळा तावडे, प्रियंका आंबोळकर, मयूरी रेवाळे, दिपाशा पवार, हर्षदा गावडे, रश्मी गोडांबे, नानी नरवणकर, समीक्षा माळी आदी उपस्थित होते.