अर्णब गोस्वामींच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा! मुंबई काँग्रेसचे पोलिसांना निवेदन

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मुंबई काँग्रेसच्या वतीने आज पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर मुंबईतल्या सर्व 94 पोलीस स्टेशनमध्येही मुंबई काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवदेन दिले. आपल्या देशाची संवेदनशील व गोपनीय माहिती सार्वजनिक करणाऱया अर्णब गोस्वामींच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून गोस्वामींना अटक करा अशी मागणी या निवेदनात केली आहे.

हे निवदेन दिल्यावर आम्ही पोलीस आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली. या संपूर्ण प्रकरणाबाबत कायदेशीर सल्ला घेऊन आणि योग्य ती कारवाई लवकरात लवकर करू, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले आहे. मुंबई पोलिसांच्या कामाची पद्धत आम्हाला माहिती आहे. त्यामुळे पोलीस योग्य ती कारवाई करून अटक करतील, असा आम्हाला विश्वास आहे, असे भाई जगताप म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या