मुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे, अध्यक्षपदासाठी अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, नसीम खान यांची नावे चर्चेत

congress

लोकसभा आणि विधानसभेतील पराभवानंतर पक्षात आलेली मरगळ दूर करून पक्ष संघटन मजबूत करण्यावर कॉँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने भर दिला आहे. महाराष्ट्राच्या प्रभारी पदात बदल केल्यानंतर विशेषतः मुंबईत आगामी काळात होणाऱया महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कॉँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. अध्यक्षपदासाठी विद्यमान उपाध्यक्ष अमरजित मनहास, माजी मंत्री सुरेश शेट्टी, नसीम खान यांची नावे चर्चेत आहेत.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी काँग्रेसमधील इच्छुकांची यादी दिवसेंदिवस वाढत चालली असल्यामुळे पक्षश्रेष्ठाRची डोकेदुखी वाढली आहे. विद्यमान उपाध्यक्ष अमरजित मनहास, माजी मंत्री सुरेश शेट्टी, नसीन खान, भाई जगताप, चरणजित सिंह आदी मुंबईतील प्रमुख नेते इच्छुकांच्या यादीत आहेत. अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या अमरजित मनहास यांनी कॉँग्रेसचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांची शुक्रवारी मुंबईत सदिच्छा भेट घेतली. अध्यक्ष म्हणून त्यांचे पारडे जड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा विचार करता सर्वांना सोबत घेऊन जाईल अशा कॉस्मोपॉलिटीन चेहऱयाकडे अधक्षपदाची धुरा सोपविली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. माजी मंत्री सुरेश शेट्टी यांच्या नावाची चर्चा अध्यक्षपदासाठी होत असली तरी शेट्टी हे मागील काही महिन्यांपासून राजकारणापासून दूर आहेत. विधानसभेची निवडणूकदेखील त्यांनी लढवली नव्हती. नसीम खान विधानसभेत लढले, पण त्यांचा पराभव झाला. त्यामुळे पालिका निवडणुकीचा विचार करता मनहास यांच्याकडे मुंबईची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई कॉँग्रेसच्या राजकारणात मनहास मागील काही वर्षांपासून सक्रिय आहेत. 2007 मधील पालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 77 नगरसेवक निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. 30 वर्षे सिनेट सदस्य, एनएसयूआय, महिला कॉँग्रेस, सेवा दल या पक्षांतर्गत संघटनांत आजवर त्यांचा चांगला संपर्क राहिला आहे.

2022 ची मुंबई पालिका निवडणूक कॉँग्रेससाठी महत्त्वाची
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आहे. पण 2022 ची मुंबई पालिका निवडणूक देशातील एकूण राजकीय घडामोडींचा विचार करता कॉँग्रेससाठी महत्त्वाची आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत भाजपकडे गेलेली कॉँग्रेसची व्होट बँक परत मिळविण्यासाठी कॉस्मोपॉलिटीन हिंदी भाषिक नेत्याकडे मुंबई कॉँग्रेसची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या