कोरोनाच्या युद्धात 80 पोलीस योद्धे शहीद, हजार पोलिसांवर उपचार सुरु

404

कोरोनाच्या युद्धात नागरिकांची सुरक्षा करताना राज्यभरात आतापर्यंत 80 पोलिस योद्धे शहिद झाले. त्यात सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर जवळपास एक हजार 204 पोलिसांवर उपचार सुरु आहेत.नागरिकांची सुरक्षा करताना पोलिसांनाही कोरोनाची लागण होत आहे. आतापर्यंत हजार पोलिसांनी कोरोनावर मात करून पुन्हा नागरीकांच्या सुरक्षेसाठी डय़ुटी सुरु केली आहे. मात्र कोरोनाच्या महामारीत 80 पोलिसांना प्राणास मुकावे लागले. तर एक हजार 204 पोलिसांवर उपचार सुरु आहेत. त्यात 139 अधिकारी आणि एक हजार 65 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या