मुंबईत 1413 कोरोनाबाधित, 40 जणांचा मृत्यू; एकाच दिवसांत 193 कोरोनामुक्त

543

मुंबईत गेल्या एकाच दिवसांत 1413 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईत आतापर्यंत आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 40 हजार 877 झाली असून मृतांची संख्या 1319 झाली आहे. दरम्यान, मुंबईत गेल्या एकाच दिवसांत 193 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्याही 16 हजार 987 वर पोहोचली आहे.

मुंबईत मृत्यू झालेल्या 40 जणांमध्ये 21 पुरुष आणि 19 महिलांचा समावेश आहे. तर 40 पैकी 26 जणांना काही दीर्घकालीन आजारही होते. मृतांमधील 20 जणांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त होते. तर 20 रुग्ण 40 ते 60 वर्षे वयोगटातील होते. दरम्यान, मुंबईत 1 जूनपर्यंत कोरोनाच्या एकूण 2 लाख 1 हजार 507 चाचण्या करण्यात आल्या आहेत. 1 जून रोजी एकाच दिवसात 3800 चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या