खासगी रुग्णालयांत मिळणार कोरोना लस!

राज्यात कोरोना लसीकरण वेगाने सुरू असून खासगी रुग्णालयांमध्येही आता 250 रुपयांत कोरोना लस मिळणार आहे. राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली. सोमवार, 1 मार्चपासून कोविड लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत असून ज्येष्ठ नागरिक आणि दीर्घ आजार असलेल्यांना लस देण्यात येणार आहे.

पहिल्या आणि दुसऱया टप्प्याचे लसीकरण सुरू असून संबंधितांना मोफत लस दिली जात आहे. मात्र खासगी रुग्णालयांत लस किती रुपयांना मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर व्यास यांनी नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी सीईओ आणि केंद्रीय आरोग्य सचिवांच्या उपस्थितीत व्हर्च्युअल मीटिंगमध्ये बोलताना ही माहिती दिली.

फक्त 250 रुपयांत उद्यापासून लसीकरणाचा तिसरा टप्पा

लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसऱया टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचाऱयांना लस देण्यात येत आहे. तर सोमवार, 1 मार्चपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे.

लसीचे 100 आणि सेवाशुल्क 150

कोविड लसीमागे 100 रुपये आणि 150 सेवाशुल्क मिळून 250 रुपये आकारण्यास परवानगी देण्यात आल्याचे अतिरिक्त सचिव आणि लसीकरण कार्यक्रमाचे संचालक वंदना गुरनानी यांनी सांगितले आहे. या निर्णयाची माहिती संबंधित राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी खासगी रुग्णालयांना द्यावी आणि लसीकरणाच्या मोहिमेत त्यांना सहभागी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या