आचारसंहितेचा बागुलबुवा नको!

13

सामना प्रतिनिधी। मुंबई

देशात लोकसभेची निवडणूक सुरू असल्यामुळे आचारसंहिता लागलेली आहे. त्यामुळे पालिकेचे विविध प्रस्ताव अडकून पडले आहेत. परंतु लोकांच्या कामासाठी आचारसंहितेचा बागुलबुवा नको. आचारसंहिता शिथिल करून लोकांची कामे तातडीने करावीत, अशी मागणी सर्व नगरसेवकांनी सुधार समितीत केली. आचारसंहितेमुळे सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी विविध प्रस्ताव राखून ठेवले आहेत.

पावसाळा जवळ आला असून रस्त्याची, नाल्याची आणि मुंबईकरांच्या जीवनाशी निगडित असलेले प्रश्न आचारसंहितेमुळे रखडले असून अधिकारी वर्ग त्याचा बागुलबुवा करत आहेत. तो बंद करून ही कामे मार्गी लावा, अशी मागणी नगरसेवक शिवसेना नगरसेवक राजू पेडणेकर यांनी केली. त्यांनी यासाठी इतर राज्यातील दाखले देऊन तिथे जर लोकांच्या कामासाठी आचारसंहिता शिथिल होऊ शकते तर इथे तसे का होत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आता पुन्हा विधानसभेची निवडणूक लागेल तेव्हा देखील आचारसंहिता लागू होईल मग मुंबईकरांच्या समस्या कशा सुटतील असे ते म्हणाले. भाजप नगरसेविका ज्योती अळवणी यांनीही नागरिकांचे प्रश्न लोकप्रतिनिधी कसे सोडविणार असा प्रश्न उपस्थित केला. समस्यांची पाहणी करण्यास काय हरकत आहे. प्रशासनाने लोकप्रतिनिधींची अडचण जाणून घेऊन सोडवायला पाहिजे असे म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या