मदतीचा बहाणा करून महिलेच्या बँक खात्यावर मारला डल्ल्ला

268

एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिलेला भामटय़ाने मदतीचा बहाणा करून तिच्या बँक खात्यातून पैसे काढल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तक्रारदार महिला असून त्या शीव परिसरात राहतात. गेल्या आठवडय़ात त्या कामानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस परिसरात आल्या होत्या. त्यांना कामाकरिता साडेपाच हजार रुपयांची गरज होती त्यामुळे त्या या परिसरातल्या एका एटीएममध्ये गेल्या. एटीएममधून पैसे काढायचे हे तक्रारदारांना माहीत नव्हते. त्याने एकाची मदत घेतली. त्याने तक्रारदारांना साडेपाच हजार रुपये एटीएममधून काढून दिले. पैसे काढल्यावर एटीएम मशीन मधून कार्ड बाहेर येत नव्हते. त्यामुळे त्या एटीएम कार्ड न घेताच बाहेर पडल्या. त्याचाच फायदा भामटय़ाने घेतला. दुसऱ्या दिवशी त्यांनी मोबाईलवर पैसे काढल्याचा मेसेज पाहिला. भामटय़ाने त्यांच्या खात्यातून 54 हजार 500 रुपये काढले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या