रेमडेसिवीरच्या बहाण्याने ऑनलाइन लुटमार, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सिप्ला कंपनीचे ऑनलाइन वितरक आहोत. रेमडेसिवीर किंवा टॉक्सिलिजुम्ब इंजेक्शन कमी किमतीत पटकन उपलब्ध करून देऊ, अशी बतावणी करीत अनेक भामटे नागरिकांना आर्थिक चुना लावत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. देशभरात असे फसवणुकीचे प्रकार होऊ लागल्याने त्याविरोधात सिप्ला कंपनीने गंभीर दखल घेत दिलेल्या तक्रारीवरून महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सिप्ला कंपनीचे अधिकृत वितरक आहोत, अशा प्रकारची जाहीरातबाजी करून त्यासाठी सिप्ला कंपनीचा लोगो वापरून काही भामटे नागरिकांना रेमडेसिवीर आणि टॉक्सिलिजुम्ब इंजेक्शन उपलब्ध करून देतो, असे सांगायचे. त्यानंतर सिप्ला पंपनीच्या नावाने बनविलेल्या बनावट बँक खात्यांमध्ये आगाऊ इंजेक्शनची अर्धी रक्कम भरण्यास सांगायचे. गरजू नागरिकांनी इंजेक्शनसाठी पैसे त्या बँक खात्यात भरल्यानंतर ते भामटे मोबाईल बंद करतात. अन्यथा बनावट औषधे घरी पाठवत असल्याच्या अनेक तक्रारी सिप्ला कंपनीकडे येऊ लागल्या होत्या. या तक्रारीनुसार महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या