महिलेचा विनयभंग करणाऱ्याला 250 सीसीटीव्ही फुटेज तपासून पकडले

प्रवासी महिलेचा वांद्रे रेल्वे स्थानकातील ब्रिजवर विनयभंग करून एक तरुण लोकलने पळून गेला. जाताना त्याने त्याच महिलेला अश्लील हावभाव करून दाखवले. स्थानकातून सटकलो म्हणजे आपण सुटलो अशा आविर्भावात तो होता, पण वांद्रे रेल्वे पोलिसांनी जवळपास 250 सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या तरुणाला ऍण्टॉप हिल येथून शोधून काढले.

घडल्या प्रकाराबाबत महिलेने वांद्रे पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अरण्ये व पथकाने वांद्रेपासून अप हार्बर मार्गावरील सर्व स्थानकातील  250 सीसीटीव्ही फुटेज तपासून मोहमद इरफान अकबर अन्सारी (49) या विकृताला बेडय़ा ठोकल्या.

आपली प्रतिक्रिया द्या