केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या घरात चोरी

548
रेल्वेमंत्री पियूष गोयल पुन्हा मंत्री बनणार

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबई येथील निवास्थानी चोरी झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या घरी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानेच ही चोरी केली आहे. विष्णु कुमार विश्वकर्मा (वय 28) असे आरोपीचे नाव आहे. गोयल यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे चोरून विष्णू फरार झाला होता. दरम्यान, पोलिसांनी त्याला दिल्लीत अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विष्णू हा गोयल यांच्या मुंबई येथील घरी मागील तीन वर्षांपासून घरगडी म्हणून काम करत होता. मागील महिन्यात गोयल यांच्या कुटुंबातील सदस्यांना घरातून काही चांदी आणि पितळाच्या वस्तू चोरी झाले असल्याचे दिसून आले. गोयल यांच्या कुटुंबातील सदस्यांना विष्णू यावर संशय आल्याने त्यांनी मुंबई येथील गावदेवी पोलीस ठाण्यात त्याविरुद्ध तक्रार नोंदवली. यानंतर आरोपी विष्णू फरार झाला होता.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीला दिल्ली येथे अटक केली असून त्याकडून पोलिसांना एक मोबाईल फोन सापडला आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल फोन तपासाला असता त्यात रेल्वे आणि वित्त मंत्रालयाशी संबंधित काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे सापडली आहेत. ही कागदपत्रे तीन वेगवेगळ्या ईमेल आयडीवर पाठविली गेली आहेत. आरोपी काही लोकांना महत्वाची माहिती देत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

आपली प्रतिक्रिया द्या