मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

720

मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गेल्या आठवड्यात 10 पोलीस उपायुक्तांच्या मुंबई अंतर्गत बदल्या केल्या होत्या. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गृहविभागाने स्थगिती दिली होती. ती स्थगिती शुक्रवारी उठविण्यात आली आहे.

नव्या आदेशानुसार करण्यात आलेल्या बदल्या पुढीलप्रमाणे : परिमंडळ सातचे उपायुक्त परमजित दहिया यांच्याकडे परिमंडळ तीनचा, संरक्षण विभागाचे प्रशांत कदम यांच्याकडे परिमंडळ सातचा, विशेष शाखा-1 चे उपायुक्त गणेश शिंदे यांच्याकडे बंदर परिमंडळ तर बंदर परिमंडळाच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडे सायबर गुन्हे शाखेचा चार्ज सोपविण्यात आला आहे.

याशिवाय गुन्हे शाखेचे शहाजी उमाप यांच्याकडे विशेष शाखा-1, परिमंडळ 11चे मोहन दहिकर यांची सशस्त्र विभाग ताडदेव येथे बदली केली आहे. तर सायबर विभागाचे विशाल ठाकूर यांच्याकडे परिमंडळ 11, अभियानचे उपायुक्त प्रणय अशोक यांच्याकडे परिमंडळ पाचचा चार्ज देण्यात आला आहे. सशस्त्र विभाग ताडदेवचे उपायुक्त नंदकुमार ठाकूर यांना प्रकटीकरणची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या