मुंबईतील चेंबूर भागामध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास अग्नितांडव पहायला मिळाला. चाळीतील दुमजली घराला लागलेल्या आगीमध्ये होरपळून एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाने याबाबत माहिती दिली आहे.
चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीमध्ये असणाऱ्या एका चाळीतील दुमजली घराला पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये 7 वर्षांच्या मुलीचा आणि 10 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आणि कुटुंबीयांना बाहेर काढत राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
चेंबूरमध्ये अग्नितांडव; एकाच कुटुंबातील 5 जणांचा आगीत होरपळून मृत्यू #mumbaifire #chembur pic.twitter.com/yQNnVE7x7v
— Saamana (@SaamanaOnline) October 6, 2024
पारिस गुप्ता (वय – 7), मंजू प्रेम गुप्ता (वय – 30), अनिता प्रेम गुप्ता (वय – 39), प्रेम गुप्ता (वय – 30), नरेंद्र गुप्ता (वय – 10), विधी गुप्ता (वय – 15) आणि गितादेवी गुप्ता (वय – 60) अशी मृतांची नावे आहेत. शॉकसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
Mumbai, Maharashtra | 5 people including 2 children died after a fire broke out at a shop in Chembur around 5 am today: BMC
— ANI (@ANI) October 6, 2024