दादर येथील पोलीस वसाहतीमध्ये सिलिंडरच्या स्फोटात बालिकेचा मृत्यू

bike-fire-pic

सामना ऑनलाईन। मुंबई

दादर पश्चिमेला असलेल्या पोलीस वसाहतीमधील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील घरात सिलिंडरचा स्फोट झाला. यात एक 10 वर्षाची बालिकेचा होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्यान, ग्निशमन दलाच्या पाच गाडया घटनास्थळावर दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.