‘गंदी बात’ फेम अभिनेत्री आयसीयूमध्ये, 48 तासांपासून करत होती शूटींग

2370

‘गंदी बात’ या वेब सीरिजमधून नावारुपाला आलेली मॉडेल व टीव्ही अभिनेत्री ‘गहना वशिष्ट’ ही गुरुवारी  शूटींग दरम्यान बेशुद्ध पडली. तिला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले असून ती उपचारांना अपेक्षित प्रतिसाद देत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

वेब शूटींगदरम्यान गुरुवारी दुपारी साडे चारच्या सुमारास गहना सेटवरच बेशुद्ध पडली. ती 48 तासांपासून शूटींग करत होती. त्यानंतर तिला जवळच्या रक्षा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा रक्तदाब कमी झाला असून तिला डायबेटीसही आहे. ती उपचारांना प्रतिसाद देत नसून तिला श्वास घेण्यास त्रास होत आहे. यामुळे तिला आयसीयूमध्ये व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

गहना वेब सीरिजचे शूटींग करत होती. सीरिजमध्ये तिच्या भूमिकेवर आधारित दृश्य असल्याने ती 48 तास नॉनस्टॉप काम करत होती. जेवणही अवेळी करत होती. त्यातच तिचे डायबेटीस वाढले. दरम्यान, तिच्या काही वैद्यकीय चाचण्यांचा अहवाल येणे बाकी आहे. त्याची आम्ही प्रतिक्षा करत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे

आपली प्रतिक्रिया द्या