विसर्जनाच्या माध्यमातून त्यांनी जपले ‘माझी वसुंधरा’ अभियान

राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी ‘माझी वसुंधरा’ अभियानाची घोषणा केली होती. या अभियानाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच दक्षिण मुंबईतील एका नव्या उपक्रमाने उभ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. दक्षिण मुंबईतील कृत्रिम तलावात गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी येणाऱया गणेशभक्तांना तुळशींच्या रोपटय़ांचे वाटप करत या अभियानास हातभार लावण्यात आला आहे. दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असून याअंतर्गत आतापर्यंत 1501 जणांना तुळशींच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमानुसार गौरी-गणपतीचे विसर्जन योग्य व सुरक्षित पद्धतीने केल्यानंतर तुळशीच्या रोपाच्या रूपामध्ये श्री गणरायाचे स्मरण चिरंतर प्रत्येकाच्या घरात रहावे तसेच घरोघरी पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्याकरिता प्रत्येक यजमान गणेशभक्तांना इकोफ्रेंडली पिशव्यामधून तुळशीच्या रोपटय़ाचे वाटप करण्यात आले. शिवसेना-युवा सेनेने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे दक्षिण मुंबईमध्ये विविध संस्था व मान्यवरांकडून स्वागत करण्यात आले आहे. दक्षिण मुंबईमध्ये मच्छीमार नगर, कुलाबा, श्रीराम मंदिरसमोर ठाकूरद्वार, फणसवाडी, कोळीवाडी, गिरगाव, मुगभाट, दुर्गादेवी मैदान, कुंभारवाडा, कामाठीपुरा मैदान, ताडदेव आरटीओ पटांगण ताडदेव येथे मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने व शिवसेना व युवा सेनेच्या वतीने स्वतंत्र कृत्रिम तलाव गणेशभक्तांच्या सोयीसाठी बांधण्यात आले तेथे हा अभियान राबविण्यात आला आहे.

हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग संघटक जयश्री बाळ्ळीकर, नगरसेविका अरुंधती दुधवडकर, सिंधुदुर्ग -कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपविभागप्रमुख समन्वयक कृष्णा पवळे, संतोष वीर, संपत ठाकूर, दीपन मोघे, छोटू देसाई, शिवाजी रहाणे, सुजित राणे, सुरेंद्र निगुडकर, सुनील कदम, युवासेना अधिकारी प्रथमेश सकपाळ, हेमंत दुधवडकर, अल्केश मेस्त्राr, शाखाप्रमुख संतोष पवार, महेंद्र कांबळे, नीलेश देवळेकर, अभिजित गुरव, बाळा अहिरेकर, वैभव मयेकर, सिद्धेश माणगावकर, प्रभाकर पाष्टे, सुरेश शेट्टी, किरण बाळसराफ यांनी विशेष परिश्रम घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या