मुंबईत गॅसगळतीची बोंबाबोंब

313

मुंबईतील काही भागांतून गॅसगळतीचे फोन खणखणल्याने अग्निशमन दलाची एकच धावपळ उडाली. सायंकाळी अनेक भागांतून या तक्रारी आल्या, पण याबाबत अधिकृत माहिती काही हाती आली नाही. चेंबूर, चकाला, मानखुर्द, पवई आणि घाटकोपरमध्ये गॅसगळती सुरू असल्याच्या तक्रारी तेथील काही रहिवाशांनी अग्निशमन दलाकडे केल्या. त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाडय़ा तातडीने तेथे रवाना करण्यात आल्या, मात्र महानगर गॅस किंवा गॅसपुरवठा करणाऱ्या इतर कोणत्याही कंपनीने आणि अग्निशमन दलाने याबाबत अधिकृत खुलासा केलेला नाही. ही गळती नेमक्या कोणत्या गॅसची होती हेसुद्धा त्यामुळे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या