‘मुंबईच्या मुली’ची हिंदुस्थानी क्रिकेट संघात निवड

118

जयेंद्र लोंढे । मुंबई

जेमिमा रॉड्रिग्स मुंबईची मुलगी… हिंदुस्थानी क्रिकेट संघात आपल्या तुफान धावांनी प्रवेश मिळवलाय…

आज महिलांचं क्रिकेट खूप जोमाने पुढे येतंय. मिताली राज, स्मृती मंधाना, पूनम राऊत यांच्या पंक्तीत येण्यासाठी मुंबईचे अजून एक नाव सज्ज होतंय. वन डेतील एका डावात द्विशतक झळकावणारी… सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारी… अन् वयाच्या १७व्या वर्षीच हिंदुस्थानी संघात प्रवेश करणारी… ही सक्सेसफुल स्टोरी आहे मुंबई येथील वांद्रे येथे कास्तव्य करणारी क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्स हिची. याच पार्श्वभूमीकर तिच्याशी साधलेला हा संवाद.

कुटुंबाचा सपोर्ट मोलाचा
वयाच्या चौथ्या वर्षापासून जेमिमा क्रिकेट खेळतेय. इनॉक व एली या दोन भावांना ती खेळताना बघायची. तिथपासूनच जेमिमा या खेळाकडे आकर्षित झाली. ती म्हणते, माझे वडील आयविन हेच माझे आदर्श आहेत. आई-वडिलांचा कोचिंग क्लासेसचा व्यवसाय आहे. त्यामुळे मला अभ्यासातही यश संपादन करता आले. इथपर्यंत मला मजल मारता आलीय ते कुटुंबीयांच्या सपोर्टमुळेच, असं ती न विसरता सांगते.

एमआयजी क्लबमुळे मनोधैर्य उंचाकले
एमआयजी क्लबच्या सहकार्यामुळे तिला या खेळामध्ये झेप घेणे शक्य झाले. या क्लबमध्ये मुलेच सराव करतात. पण तिच्यासाठी क्लबने हा नियम मोडला. मुलांसोबत क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली. त्यामुळे जेमिमाचे मनोधैर्य उंचावले. एवढेच नव्हे तर ती पुढे म्हणते, माझ्यासाठी वेगळ्या नेटचीही व्यवस्था त्यांनी करून दिली. बॉलिंग मशीनची सुविधाही पुरवण्यात आली. असे कौतुक तिने एमआयजी क्लबचे केले.

स्पर्धांमध्ये धावांचा रतीब
जेमिमा रॉड्रिग्स हिने गेल्या काही महिन्यांमध्ये धावांचा पाऊस पाडलाय. १९ वर्षांखालील सुपर लीग स्पर्धेत ११ सामन्यांमध्ये एक द्विशतकासह एकूण सहा शतके झळकवण्यात तिला यश मिळाले. तिच्या झंझावाती कामगिरीमुळेच मुंबईला दुसरा क्रमांक पटकावता आला. नंतर ‘हिंदुस्थान-अ’ विरुद्ध ‘बांगलादेश-अ’ यांच्यामधील वन डे लढतीत ५६ धावांची तर ट्वेंण्टी-२० लढतीत ४२ चेंडूंत ६३ धावांची खेळी साकारत आपली चुणूक तिने दाखवली. चॅलेंजर ट्रॉफीमध्ये इंडिया ग्रीनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्सने सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसरा क्रमांक पटकाकला व संघाला दुसरा क्रमांक मिळवून दिला.

स्क्वेअर व पुलच्या फटक्यांकर मेहनत घेणार
जेमिमा सांगते, हिंदुस्थानी संघात माझी निवड झालीय ती दक्षिण आप्रिकन दौऱ्यासाठी. तेथील खेळपट्ट्या तेज गोलंदाजांना पोषक असतात. त्यामुळे उसळत्या चेंडूंवर फलंदाजी करण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागणार आहे. त्यासाठी मी आगामी दिवसांत लक्ष केंद्रित करणार आहे ते स्क्वेअर क पुलच्या फटक्यांवर. जेणेकरून प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा समर्थपणे मुकाबला करता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या