मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, अंजनारी पुलावरची वाहतूक थांबवली

konkan-rain

मुसळधार पावसामुळे काजळी नदीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर अंजनारी मठ येथील स्वयंभू श्री दत्त मंदिर पुन्हाएकदा पाण्याखाली गेले आहे. आज सोमवारी 8 आॉगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून आंजणारी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलीस उप निरीक्षक तेजस्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अंजणारी पुलावरून वाहतूक बंद करण्यात आल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. देवधे पावस मार्गे वाहतूक वळवली आहे, तर पाली दाभोळ मार्गे वळवली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून संततधार पणे पडणाऱ्या तुफान पावसाने लांजा तालुक्यात जोरदार आगमन केले आहे .प्रचंड प्रमाणात आलेल्या पावसामुळे काजळी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सोमवारी पुरामुळे मठ येथे नदीकाठी वसलेले स्वयंभू श्री दत्त मंदिर हे पुन्हा एकदा पाण्याखाली गेले आहे.

सोमवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्याने काजळी नदीला प्रचंड प्रमाणात पूर आला आहे नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून आंजणारी येथील ब्रिटिश कालीन पुल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला असून पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेट्स लावून वाहनांना थांबवून ठेवले आहे. तर या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. काही वाहतूक ही पावस मार्गे वळवण्यात आली असून या ठिकाणी लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील तसेच पोलिस आणि होमगार्ड या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. या बरोबरच विलवडे येथील मुचकुंदी नदीला आलेल्या पुरामुळे हा रस्ता पाण्याखाली गेला आहे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे तर प्रचंड पावसामुळे काही ठिकाणी विद्युत तारा, पोल पडून मोठ्या प्रमाणात वीज खंडित झाली आहे.