मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात, महिला जागीच ठार

accident

मुंबई-गोवा महामार्गावर पेण रामवाडी पुलावर ट्रेलर व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने कोलवे गावावर शोककळा पसरली आहे.

कोलवे येथील जगदीश कोळी व त्यांच्या पत्नी तृप्ती जगदीश कोळी हे दांपत्य दुचाकीवरून वडखळ कडून पेणच्या दिशेने जात होते. रामवाडी रेल्वे पुलावर आले असता या पुलावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यात दुचाकी घसरली. यावेळी तृप्ती या पडल्या आणि ट्रेलरखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेमुळे मुंबई गोवा महामार्गाच्या कंत्राटदारा व महामार्गाचे अधिकारी यांच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सदर कंत्राटदार कंपनी विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या