पांडुरंगवाडी ते मसुराश्रम येथील पूरस्थितीवर उपाययोजना करणार!

66

गोरेगाव पूर्व येथील पांडुरंगवाडी ते मसुराश्रम येथे दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱया पूरस्थितीच्या नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासंदर्भात शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी रेल्वे व पालिका अधिकाऱयांसोबत सोमवारी पाहणी दौरा केला.

पावसाळ्यात दरवर्षी गोरेगाव येथे पांडुरंगवाडी ते मसुराश्रम परिसरात पावसाचे पाणी दुकाने व नागरिकांच्या घरांमध्ये भरते. यामुळे मोठय़ा प्रमाणात वित्तहानी देखील होत असते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती खासदार कीर्तिकर यांनी दिली. स्थानिक नगरसेविका साधना माने, पश्चिम रेल्वेचे सहाय्यक अभियंता एन. दास, ब्रिजेश मीना, पालिका उपायुक्त रणजीत ढाकणे, पी. दक्षिणचे सहाय्यक आयुक्त क्षीरसागर आदी यावेळी उपस्थित होते.

रेल्वेच्या हद्दीतील गटारे पावसाळ्यापूर्वी उपसणार

रेल्वेलाइन परिसरातील गटारांमधील माती सात दिवसांत उपसली जाईल. नाला क्रमांक 49/50 येथे रेल्वेलाइनखालून 1800 मि.मी. व्यासाची पाइपलाइन पावसाळ्यापूर्वी टाकण्यात येईल, असे रेल्वेच्या अधिकाऱयांनी यावेळी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या