भारतीय कामगार सेनेचा बळीराजाला मदतीचा हात; ग्रॅण्ड हयात युनिटतर्फे 6 लाखांचा धनादेश

833

निसर्गचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी भारतीय कामगार सेनेने मदतीचा हात पुढे केला आहे. ग्रॅण्ड हयात हॉटेल युनिटने तब्बल सहा लाखांची मदत शिवसेना मदत निधीत जमा केली.

भारतीय कामगार सेनेच्या हॉटेल ग्रॅण्ड हयात मुंबई युनिटमधील कर्मचाऱ्यांतर्फे सहा लाख रुपयांचा ‘शिवसेना मदत निधी’ जमा करण्यात आला. या मदतीचा धनादेश शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, व्यवस्थापनातर्फे जुनिपर हॉटेलचे अमित सराफ, हॉटेल मॅनेजर सोनाली झगडे, रेखा केळस्कर उपस्थित होते. कामगार सेना चिटणीस मनोज धुमाळ यांच्या संकल्पनेनुसार हा मदतनिधी जमा करण्यात आला. भारतीय कामगार सेना अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिवसेना मदत निधी’ जमा करण्यास युनिट अध्यक्ष प्रशांत नाईक, अभय प्रभू, कुश गवस, सिद्धेश पांढरकामे, संदेश परब, संजय जाधव, संजय पाते, हीना शेख यांनी पुढाकार घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या