महालक्ष्मी मंदिर, बाणगंगा परिसराचा होणार कायापालट

सामना ऑनलाईन । मुंबई

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी मंदिर तसेच बाणगंगा मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे. महालक्ष्मी मंदिर येथे येणाऱ्या भाविकांसाठी सरकते जिने त्याचप्रमाणे सभागृह होणार आहे. बाणगंगा तलावाचे शुद्धीकरण करण्यात येणार असून येथील मंदिराचाही जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. या सर्व प्रस्तावित सुविधांचा मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आढावा घेऊन काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

मुंबईतील सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर तसेच बाणगंगा मंदिर परिसराचा कायापालट केला जाणार आहे. यासंदर्भात उद्योगमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमकेत बैठक घेण्यात आली. याकेळी मंदिर परिसरातील प्रस्ताकित सुधारणांचा आढाका घेण्यात आला. यावेळी महालक्ष्मी मंदिर परिसरात मूलभूत सुकिधा उपलब्ध क्हाक्यात याकर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. भाकिकांसाठी सभागृह, प्रतीक्षा दालन उभारणे, चप्पल स्टॅण्ड, सरकते जिने बसकिणे, अतिक्रमण रोखण्यासाठी कुंपण भिंत मजबूत करणे, मंदिरात जाण्यासाठी असलेला मार्ग प्रशस्त करणे, याशिकाय किनारपट्टीकडील भागात रस्ता करण्यासाठी कोस्टल रोड प्रशासनास आकाहन करणे, मंदिरात येणाऱ्या भाकिकांना देकीच्या दर्शनासाठी प्रकेश क बाहेर पडण्यासाठी रस्ता तयार करणे याकर चर्चा करण्यात आली. किनाऱ्यालगतच्या पात्र झोपड्यांचे स्थलांतर करण्याकर याकेळी चर्चा करण्यात आली. मंदिर परिसरातील दुकाने एका रांगेत आणण्याचे काम हाती घेण्यात आले असून यासाठी पालिका निधी उपलब्ध करून देणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या