खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांना न्यायालयाची नोटीस

4077

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारी जमीन वाटप प्रकरणात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, राज्याच्या महसूल विभागाचे सचिव, अमरावती जिल्हाधिकारी, अमरावती महापालिका आयुक्त, अमरावती विभागीय आयुक्त, राणा शिक्षण संस्था आदींना नोटीस बजावून चार आठवडयात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

माजी खासदार आनंदराव अडसुळ, जयंत वंजारी व सुनील भालेराव यांनी या जमीनवाटप प्रकरणाविरोधात जनहित याचिका दाखल केली असून त्यावर न्यायमूर्ती रवी देशपांडे व मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राणा शिक्षण संस्थेला तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याकरिता मौजा पेठ येथील सरकारी जमीन वाटप करण्यात आली आहे. परंतु, त्या जमिनीचा सध्या दिल्ली पब्लिक स्कूलकरिता उपयोग केला जात आहे. जमिनीचा उपयोग बदलताना सरकारची परवानगी घेण्यात आली नाही, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या