हायकोर्टाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तीपदी भूषण धर्माधिकारी

340

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांच्या निवृत्तीनंतर हायकोर्टाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तीपदी भूषण धर्माधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्राच्या विधी व न्याय विभागाने तशी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

मूळचे नागपूर येथील असलेले न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी नागपूर विद्यापीठातून बी.एस.सी. (जीवशास्त्र), अतिरिक्त बी. ए. इंग्रजी साहित्यात आणि एल.एल.बी. बी.एस्सीचे शिक्षण घेतले आहे. 1980 साली विधी शाखेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नागपुरात कायद्याचा सराव केला. तसेच जबलपूर (मध्य प्रदेश) येथे ऍड. वाय. एस. धर्माधिकारी यांच्याकडे काम केले. 2004 साली अतिरिक्त न्यायाधीश तर 2006 साली न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या