मुलाच्या हत्येचा आरोप असलेल्या डॉक्टर आईची निर्दोष सुटका

mumbai-high-court

मुलाच्या हत्येचा आरोप असलेल्या होमिओपॅथी डॉक्टर आईला हायकोर्टाने दिलासा दिला आहे. गेल्या सात वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या महिलेची न्यायमूर्तीं साधना जाधव आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

टिळकनगर येथील नंदा झोडगे यांना तीन मुले आहेत. मुलगा रोहन हा वारंवार त्रास देत असल्याने त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. 5 ऑक्टोबर 2013 साली घरासमोर रोहनचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. आई नंदा हिने त्याचा खून केल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी तिला अटक केली. सत्र न्यायालयाने 19 नोव्हेंबर 2019 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याविरुद्ध नंदा जोडगे यांनी अॅड. अनिकेत निकम यांच्यामार्फत हायकोर्टात अपील दाखल केले. संपूर्ण घटनेत कोणताच प्रथमदर्शनी साक्षीदार नाही तसेच या प्रकरणात सबळ पुरावे नाहीत असे अॅड. निकम यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

आपली प्रतिक्रिया द्या