लग्नाला 50 जणांना परवानगी मग जैन मंदिर बंद का? भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे सरकारला आदेश

600
mumbai-highcourt

कोरोनाचा धोका वाढू नये यासाठी सरकारने लग्न, अंतिमविधीसाठी मोजक्या लोकांना हजर राहण्याची परवानगी दिली आहे. मात्र जैन धर्मियांना पर्यूषण काळात बंदी घालण्यात आली आहे या विरोधात जैन बांधकांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून न्यायालयाने या प्रकरणी सरकारला गुरुवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

भांडुपमधील रहिवासी अंकित कोरा यांनी ऍड. प्रफुल्ल शहा यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली. 15 ते 23 ऑगस्ट दरम्यान येणाऱया पर्यूषण सोहळ्यात जैन मंदिर खुली करण्याची व पुजा करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. या याचिकेवर न्यायामूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनाकणी घेण्यात आली. त्याकेळी केंद्र सरकारच्या कतीने सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की केंद्र सरकारने प्रार्थना स्थळे खुली करण्यावर बंधन घातलेले नाही, प्रार्थना स्थळांवर जायला सशर्त परवानगी आहे, मात्र राज्य सरकारने यावर परिस्थितीनुरूप निर्णय घ्याला हवा त्यावर लोकांनी मार्गदर्शक तत्वे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळले तर त्यांना सशर्त परवानगी द्यायला हरकत नाही, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. याबाबत राज्य सरकारला निवेदन देण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून सरकारला भूमिका स्पष्ट करण्यास खंडपीठाने बजावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या