बालवाडी, केजीचे धोरण निश्चित करा!

46

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

केजी, बालवाडी या पूर्व प्राथमिक शिक्षणासंदर्भात राज्य सरकारने 31 डिसेंबरपर्यंत धोरण निश्चित करावे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. पूर्व प्राथमिक शिक्षणाचा सध्या व्यवसाय झाला असून पूर्व प्राथमिकचा अभ्यासक्रम, शुल्क निश्चित केलेले नाही असा आरोप करणारी जनहित याचिका डॉ. जगन्नाथ पाटील यांनी दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने वरील आदेश दिले.

आपली प्रतिक्रिया द्या