तपासात घिसडघाई का? बदलापूर प्रकरणी उच्च न्यायालयाने पोलिसांना पुन्हा फटकारलं

बदलापूर प्रकरणाच्या तपासात गांभीर्य नाही, हा तपास असमाधानकारक आहे अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारलं आहे.

कोर्टाने म्हटलं की आरोपपत्र दाखल करताना पोलिसांनी घाई करता कामा नये. तपास योग्य दिशेने सुरु ठेवण्याची जबाबदारी पोलिसांनी घेतली पाहिजे अशी ताकिद न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. या समितीने बाल लैंगिक अत्याचार आणि या संबंधित गुन्ह्यांवर उपाययोजना सुचवावी असेा म्हणत न्यायालयाने बेटी बचाओ बेटी पढाओ यावरही भर दिला.