विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रामदास आत्राम यांच्या नियुक्तीला हायकोर्टाची स्थगिती!

मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त कुलसचिव डॉ. रामदास आत्राम यांच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली. प्रभारी असलेल्या डॉ. बळीराम गायकवाड यांच्याकडे या पदाचा चार्ज तत्काळ सोपविण्याच्या सूचना करत हायकोर्टाने या पदाच्या नियुक्तीसाठी नियमित प्रक्रिया राबवण्याचे विद्यापीठ प्रशासनाला आदेश दिले.

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव अजय देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कुलसचिव पदावर प्रभारी डॉ. बळीराम गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली, मात्र महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 च्या कलम 8(5) नुसार राज्य सरकारने आपल्या अधिकारांतर्गत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने रिक्त कुलसचिव पदावर एक वर्षासाठी डॉ. रामदास आत्राम यांची नियुक्ती केली. या नियुक्तीवर पुलगुरू सुहास पेडणेकर यांनी सरकारला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली तसेच या निर्णायाबाबत फेरविचार करण्याची विनंती केली. या नियुक्तीविरोधात सिनेट सदस्य धनेश सावंत यांनी हायकोर्टात अॅड. अंजली हेळेकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर आज न्यायमूर्ती एस. सी. गुप्ते आणि न्यायमूर्ती एस. पा. तावडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या