बेशिस्त पार्किंगविरोधात काय कारवाई केली; हायकोर्टाचा मुंबई पोलीस, पालिका प्रशासनाला सवाल

506
mumbai-highcourt

मुंबईतील बेकायदा पार्किंगची समस्या गंभीर होत असल्याने हायकोर्टाने पोलिसांसह पालिका प्रशासनाला चांगलेच खडसावले. बेकायदा पार्किंग करून दादागिरी करणाऱया वाहनचालकांवर कारवाई करा तसेच वाहतुकीचे नियम कोणीही धाब्यावर बसवू नयेत यासाठी अधिक कठोर कायदे करा असे बजावतानाच या बेशिस्त पार्किंग करणाऱयांविरोधात आतापर्यंत काय कारवाई केली, असा सवाल खंडपीठाने प्रशासनाला केला. एवढेच नव्हे तर याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले.

मुजोर टॅक्सीचालकांचा बंदोबस्त करण्यासाठी काय उपाययोजना केल्या त्याबाबत माहिती देण्याचे आदेश दिले व सुनावणी 10 डिसेंबरपर्यंत तहकूब केली. मुंबईतील बेशिस्त पार्किंगविरोधात सामाजिक कार्यकर्ते टेकचंद खानचंदानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या