हिंदू सणांनाच लक्ष्य का करता, हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना झापले

62
mumbai bombay-highcourt

सामना प्रतिनिधी । मुंबई

प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हिंदू सणांना लक्ष्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱया तथाकथित समाजसेवकांचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चांगलेच कान उपटले. समाजातील जातीय सलोखा बिघडवण्याचे काम अशा याचिका करतात असे स्पष्ट करत न्यायालयाने याचिकादारांना फटकारले, तसेच याचिका मागे घेण्याचे आदेश दिले.

दसऱयादिवशी करण्यात येणाऱया रावण दहनाच्या कार्यक्रमांवर बंदी घालावी तसेच सरकारतर्फे आयोजित करण्यात येणाऱया गणेश सजावट स्पर्धेवर बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका जनार्दन मून यांच्या नागरी हक्क संरक्षण मंचच्या वतीने हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. निव्वळ प्रसिद्धीसाठी हिंदूंच्या सणांविरोधात याचिका दाखल करण्यात येत असल्याने हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना चांगलेच झापले तसेच यापुढे अशा याचिका करू नका, अशी तंबी देत ही याचिका मागे घेण्याचे आदेश दिले.

आपली प्रतिक्रिया द्या