दोन आठवड्याच्या संसारासाठी त्याला भरावी लागली 22 लाखांची पोटगी

विक्रोळीतील एका तरुणाला घटस्फोट घेणं चांगलच महागात पडलं आहे. लग्नानंतर अवघ्या दोन आठवड्याभरातच संसार मोडलेल्या या तरुणाला मुंबई उच्च न्यायालयाने 22 लाखांची पोटगी भरण्याचे आदेश दिले आहेत.

रेवती मोहिते यांचे 2011 साली विक्रोळी येथे राहणाऱ्या एका तरुणासोबत लग्न झाले होते. पण दुर्देवाने त्यांचा संसार दोन आठवडेच टिकला. रेवती यांनी घरगुती वाद/हिंसाचाराचे करत पतीपासून त्या वेगळ्या राहू लागल्या व 2012 ला त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. पत्नी ही कमवती नाही तर पती हा एका चांगल्या कंपनीत कामाला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने पतीला तब्बल 22 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. पतीने हे आदेश मान्य केले असून 10 फेब्रुवारीपर्यंत प्रत्येकी 10 लाखांचे दोन हफ्ते आणि उर्वरित 2 लाख रुपये दहा मार्चपर्यंत देणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या