हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषयांची भीती: सर्व्हे

69

सामना ऑनलाईन। मुंबई

शाळा कॉलेजेसच्या परीक्षा सुरु झाल्या असून विद्यार्थीही कसून अभ्यास करत आहे. पण देशातील बऱ्याच जणांना गणित आणि विज्ञान या विषयांची भीती वाटत असल्याने त्यांना ताणही जाणवू लागला आहे. असे ब्रेनली या जगातील सर्वात मोठ्या पिअर-टू-पिअर लर्निंग कम्युनिटीने नुकत्याच केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आले आहे.

या सर्वेक्षणात मुंबईसह देशभरातील सुमारे 5000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील निदर्शनानुसार 65 टक्के विदयार्थी गणित आणि विज्ञान या दोन विषयांच्या तयारीवर जास्त भर देणार असल्याचे समजले. तर 64 टक्के विदयार्थ्यांनी या विषयांची अधिक तयारी करणे गरजेचे असल्याचे मत नोंदवले. यावेळी इतर विषयांसोबतच या दोन विषयांच्या तयारीसाठी विद्यार्थी काही पद्धतींचा अवलंब करताना दिसून आले. पुस्तके आणि नोट्सना सर्वाधिक 60 टक्के प्रतिसाद मिळाला असला तरीही ऑनलाईन पर्याय आणि स्त्रोत 30 टक्के तर उत्तम आकलन आणि अभ्यासाकरिता 10टक्के प्रतिसाद नोंदवण्यात आला.

तर काहीजणांनी परीक्षेदरम्यान केलेला अभ्यास विसरू याची सर्वाधिक भीती व्यक्त केली. यावेळी परीक्षेच्या ताणापासून मुक्त राहण्याकरिता विद्यार्थ्यांमध्ये संगीत ऐकण्याला सर्वाधिक पसंती दिसून आली तर सिनेमा पाहणे, गेम्स खेळणे, वामकुक्षी घेणे इत्यादी इतर पर्यायही विद्यार्थ्यांमध्ये प्रिय असल्याचे आढळले. संपूर्ण देशातील विद्यार्थी परीक्षाकाळात नेमक्या कशा परिस्थितीतून जातात, उत्तीर्ण होण्यासाठी करण्यात येणारे व्यापक प्रयत्न याचे चित्र सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले.

आपली प्रतिक्रिया द्या