मुंबई इंडियन्सचा चषक सिद्धिविनायकाच्या चरणी

26

सामना ऑनलाईन । मुंबई

रायझिंग पुणे सुपरजायंट्सवर एका धावेने निसटता तरीही धमाकेदार विजय मिळवत मुंबई इंडियन्सने काल तिसऱ्यांदा आयपीएल-१० चं विजेतेपद पटकावलं. अंतिम लढत अतिशय चुरशीची ठरली. पुण्याला नमवत मुंबईने आयपीएलच्या चषकावर नाव कोरलं.

हा मानाच्या तिसऱ्या विजयाचा चषक आज सिद्धिविनायकाचरणी ठेवण्यात आला. यावेळी मुंबई इंडियन्सचे मालक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी उपस्थित होता. आयपीएलमध्ये तीन वेळा जिंकणारा संघ म्हणून मुंबई इंडियन्सची वर्णी लागली आहे. या यशाला बाप्पाचा आशीर्वाद मिळावा म्हणून मुंबई इंडियन्सचा चषक सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या