मुंबई इंडियन्स रोहितसह 4 खेळाडूंना डच्चू देणार?

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील आगामी हंगामाच्या मेगा लिलावाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र आयपीएलमधील संघ कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवणार, याबाबत सोशल मीडियावर सध्या चर्चा रंगली आहे. मुंबई इंडियन्स रोहित शर्मासह कर्णधार हार्दिक पंड्यालाही मुंबई इंडियन्समधून रिलीज करू शकते असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. त्यांच्याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज टीम डेव्हिड यांनाही संघातून रिलीज केले जाण्याची शक्यता आहे, मात्र मेगा लिलावापूर्वी सूर्यपुमार यादवला कायम ठेवून मुंबई इंडियन्स पुढील हंगामासाठी नवीन कर्णधाराची नियुक्ती करू शकते.

जसप्रीत बुमराह संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज राहू शकतो. त्यांच्याशिवाय, मुंबई इंडियन्स इशान किशन आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवण्याचा दावा करत आहे. दरम्यान, मुंबई आकाश मधवाल आणि निहाल वढेरा यांना राईट टू मॅच कार्ड वापरू शकते.