केईएम – नानावटीमध्ये अंतिम झुंज

मुत्ता पुचीकोरचेच्या (नाबाद 40 धावा व 2 बळी) अष्टपैलू खेळामुळे केईएम हॉस्पिटलने जे. जे. हॉस्पिटलवर 6 गडी राखून विजय मिळविला आणि आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. केईएम हॉस्पिटल विरुद्ध नानावटी हॉस्पिटल यांच्यामध्ये अंतिम लढत 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता शिवाजी पार्प मैदानात होईल.

आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्टस् अॅपॅडमीतर्फे मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यतेने शिवाजी पार्प येथे सुरू असलेल्या उपांत्य लढतीमध्ये केईएम हॉस्पिटलच्या लक्ष्मण गीतेने पहिलेच षटक निर्धाव टाकत पहिला बळीदेखील मिळविला. जे. जे. हॉस्पिटलची सुरुवात निराशाजनक होऊनही रोहन म्हापणकर (30 धावा), सुभाष शिवगण (20 धावा), विलास जाधव (24 धावा), राकेश शेलार (18 धावा), मनोज जाधव (13 धावा) यांनी संयमी फलंदाजी करून मर्यादित 20 षटकांत 7 बाद 122 धावांचा पल्ला गाठला. धावांचा पाठलाग करताना केईएम हॉस्पिटलने 18 व्या षटकाला 4 बाद 123 धावसंख्या रचत अंतिम फेरीत प्रवेश केला.

 

आपली प्रतिक्रिया द्या